भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीमुख साजिरें कुंडलें शोभती । शंख चक्र हातीं पद्म गदा

shrimukh sajiren kundalen shobhati | shankh chakra hatin padma gada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीमुख साजिरें कुंडलें शोभती । शंख चक्र हातीं पद्म गदा ॥१॥ पीतांबर कासें वैजंयंती कंठीं । टिळक लल्लाटीं चंदनाचा ॥२॥ मुगुट कुडलें झळके पाटोळा । घननीळ सांवळा विटेवरी ॥३॥ श्रीवत्सलांचन हृदयीं भूषण । एका जनार्दन तृप्त जाला ॥४॥