भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों

shrigururaya par nahin tav guni | mhanoni vinavayi karitason

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीगुरुराया पार नाहीं तव गुणी । म्हणोनि विनवयी करितसों ॥१॥ मांडिला व्यवहार हरिनामीं आदर । सादरा सादरा वदवावें ॥२॥ न कळेचि महिमा ऊंच नीचपणे । कृपेंचे पोसणें तुमचे जाहलों ॥३॥ एका जनार्दनी करुनी स्तवन । घातिलें दुकान मोलेंविण ॥४॥