भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगुरुचें नाममात्र । तेंचि आमुचें वेदशास्त्र

shriguruchen namamatra | tenchi amuchen vedashastra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीगुरुचें नाममात्र । तेंचि आमुचें वेदशास्त्र ॥१॥ श्रीगुरुंचे तीर्थ मात्र । सकळ तीर्था करी पवित्र ॥२॥ श्रीगुरुंचे चरणरज । तेणें आमुचें जाहलें काज ॥३॥ श्रीगुरुंची ध्यानमुद्रा । तेंचि आमुचि योगनिद्रा ॥४॥ एका जनार्दनीं मन । श्रीगुरुचरणीं केलें लीन ॥५॥