भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करिता उच्चारणा । तुटताती यमयातना । नाना पातकियाच्या

shrigovinda madhusudana | aisha namanchi karita uchcharana | tutatati yamayatana | nana patakiyachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीगोविंदा मधुसूदना । ऐशा नामांची करिता उच्चारणा । तुटताती यमयातना । नाना पातकियाच्या ॥१॥ माना हाचि रे विश्वास । नामीं धरा दृढ वास । आणिक ते सायास । फोलकत न करावें ॥२॥ योगयाग कसवटी । नको नको कोरड्या गोष्टी । वांयाचि हिंपुटी । शिणती मुर्ख ॥३॥ शरण रिघा जनार्दनीं । एकपणें मन करुनी । एका जनार्दनीं ध्यानी मनीं । चिंतन तें असों द्यावें ॥४॥