भजनी मालिका
← भजनांकडे परत

श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं

shridnyanadeven yeuni svapnant | sangitali mat majalagin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
श्रीज्ञानदेवें येउनी स्वप्नांत । सांगितली मात मजलागीं ॥१॥ दिव्य तेज:पुंज मदनाचा पुतळा । परब्रह्म केवळ बोलतसे ॥२॥ अजानवृक्षाची मुळी कंठास लागली । येऊनि आनंद स्थळीं काढ वेगीं ॥३॥ ऐसें स्वप्न होतां आलों अलंकापुरीं । तंव नदीमाझारी देखिलें द्वार ॥४॥ एका जनार्दनीं पूर्वपुण्य फळलें । श्रीगुरु भेटले ज्ञानेश्वर ॥५॥