भजनी मालिका
← भजनांकडे परत

शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे

shokavava myan dehe | aisen nenon potin ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥ तरीच नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥ जावें वनांतरा । येणें उद्देशें दातारा ॥२॥ तुका म्हणे गिरी । मज सेववावी दरी ॥३॥