भजनी मालिका
← भजनांकडे परत

शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा

shikalya bolache sangatil vad | anubhav bhed nahin kona

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥ तुका म्हणे जैसी लांचासाठीं ग्वाही । देतील हे ठावी नाहीं वस्तु ॥३॥