भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे

shevatinchi he vinanti | pay chittin rahave

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥ ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥ भाग्याविण कैंची भेटी । नव्हे तुटी चिंतनें ॥२॥ तुका म्हणे कळसा आलें । हें विठ्ठलें परिसावें ॥३॥