भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी

shevatichi vinavani | santajanin parisavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥ पुढें फार बोलों काई । अवघें पायीं विदित ॥२॥ तुका म्हणे पडिलों पायां । करा छाया कृपेची ॥३॥