भजनी मालिका
← भजनांकडे परत

शेषादिक श्रमले वेद मौनावले । पुरणें भागलीं न कळे त्यांसी

sheshadik shramale ved maunavale | puranen bhagalin na kale tyansi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शेषादिक श्रमले वेद मौनावले । पुरणें भागलीं न कळे त्यांसी ॥१॥ तोचि हा सोपा सुलभ सर्वांसी । विठ्ठल पंढरीसी उघड लीळा ॥२॥ शास्त्राचिया मता न कळे लाघव । तो हा विठ्ठलदेव भीमातीरीं ॥३॥ कर्म धर्म जयालागीं आचरती । ती ही उभी मूर्ति विटेवरी ॥४॥ आगमां निगमां न कळे दुर्गमा । एका जनार्दनी प्रेमा भाविकांसी ॥५॥