भजनी मालिका
← भजनांकडे परत

शांतीचेनि मंत्रें मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा

shanticheni mantren mantruni vibhuti | lavili dehaprati sarva anga

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शांतीचेनि मंत्रें मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥ तेणें तळमळ हारपले व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥ लिगाडाची मोट बांधोनि टाकिली । वासना भाजली क्रोध अग्नी ॥३॥ एका जनार्दनीं शांत जाहला देव । कामनीक देव प्रगटला ॥४॥