भजनी मालिका
← भजनांकडे परत

शांती क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद

shanti kshama daya dnyanavidnyan | nirasale jan bhedabhed

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शांती क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद ॥१॥ यापरतें सुलभ आम्हां एक नाम । मोक्ष मुक्ति धाम फोलकट ॥२॥ न करुं सायास ब्रह्माज्ञान आटी । योगाची कसवटीं वायां तप ॥३॥ एका जनार्दनीं एक जनार्दनीं । जनींवनीं संपुर्ण भरलासे ॥४॥