भजनी मालिका
← भजनांकडे परत

शादीचें तें सोंग । संपादितां राजा वेंग

shadichen ten song | sampaditan raja veng

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
शादीचें तें सोंग । संपादितां राजा वेंग ॥१॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥ दिसतें तें लोपी । झिंज्या ओढोनियां पापी ॥२॥ सिंदळी त्या सती । तुका म्हणे थुंका घेती ॥३॥