भजनी मालिका
← भजनांकडे परत

शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा अंगीं वसे

shabdik shabdacha kariti kantala | dveshacha umala angin vase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा अंगीं वसे ॥१॥ शब्द ब्रह्माज्ञानें फुगविती अंग । वाउगाची सोंग गर्व वाहाती ॥२॥ सर्वां भूतमात्रीं शब्द तो संचला । न कळे तयाला शब्दभेद ॥३॥ एका जनार्दनीं शब्दाचा भेद । न कळे प्रसिद्ध ज्ञानीयासी ॥४॥