भजनी मालिका
← भजनांकडे परत

सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा

sevenche karan mukhya to sadabhav | itar te vav indriy badha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सेवेंचे कारण मुख्य तो सदभाव । इतर ते वाव इंद्रिय बाधा ॥१॥ साधन हेंचि साधी तोडी तूं उपाधी । नका ऋद्धिसिद्धि आणिक कांही ॥२॥ नामाचा उच्चार मुख्य हेचि भक्ति । एका जनार्दनीं विरक्ति तेणें जोडें ॥३॥