भजनी मालिका
← भजनांकडे परत

सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार

savadin kandan ovi narayan | nivade apan bhus sar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥ मुसळ आधारीं आवरूनि धरीं । सांवरोनि थोरीं घाव घालीं ॥ध्रु.॥ वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥२॥ कांडिता कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥३॥ तुका म्हणे रूप उमटे सरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध झाला ॥४॥