भजनी मालिका
← भजनांकडे परत

सत्यपुरीं ऐसें म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा

satyapurin aisen mhanati teresi | hari bhaktarashi kumbhar gora

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सत्यपुरीं ऐसें म्हणती तेरेसी । हरि भक्तराशी कुंभार गोरा ॥१॥ नित्य वाचे नाम आठवी विठ्ठल । भक्तिभाव सबळ ह्रदयामाजीं ॥२॥ उभयतांचा प्रपंच चालवी व्यापार । भाजन अपार घडितसे ॥३॥ एका जनार्दनीं ऐका सविस्तर । पुढील प्रकार आनंदानें ॥४॥