भजनी मालिका
← भजनांकडे परत

सात्विकाभरणें रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊं लागे

satvikabharanen romasi datane | svedache jivan yeun lage

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सात्विकाभरणें रोमासी दाटणे । स्वेदाचे जीवन येऊं लागे ॥१॥ कांपे तो थरारी स्वरुप देखे नेत्री । अश्रु त्या भीतरीं वाहताती ॥२॥ आनंद होय पोटीं स्तब्ध जाती कंठीं । मौन वाक्पृटीं धरुनी राहे ॥३॥ टाकी श्वासोच्छवास अश्रुभाव देखा । जिरवुनी एका स्वरुप होय ॥४॥ एका जनार्दनीं ऐसेम अष्टभाव । उप्तन्न होतां देव कृपा करी ॥५॥