भजनी मालिका
← भजनांकडे परत

साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली

sati bhagirathi satravichi dhar | subhakti te makar samarpili

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
साती भागीरथी सत्रावीची धार । सुभाक्ति ते मकर समर्पिली ॥१॥ अर्पियले स्नान झालें समाधान । मनाचें उन्मन होऊनियां ॥२॥ चित्त हें शीतळ गेली तळमळ । पाहिलें निढळ अमूर्तासी ॥३॥ एका जनार्दनीं केला जयजयकार । अत्रीवरद थोर तिन्हीं लोकीं ॥४॥