भजनी मालिका
← भजनांकडे परत

सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा

satava to sarvathayin vase | shankaradik dhyati taya apeksha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सातवा तो सर्वाठायीं वसे । शंकरादिक ध्याती तया अपेक्षा ॥१॥ तो सातवा हृदयीं आठवा । आठवितो तुटे जन्ममरण ठेवा ॥२॥ सातवा हृदयीं घ्यावा जनीं वनीं पहावा । पाहुनियां ध्यावा मनामाजीं ॥३॥ एक जनार्दनीं सातवा वसे मनीं । ध्नय तो जनीं पुरुष जाणा ॥४॥