भजनी मालिका
← भजनांकडे परत

सर्वांमाजीं सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जें कां

sarvammajin sar nam vithobache | sarva sadhananche ghar jen kan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सर्वांमाजीं सार नाम विठोबाचे । सर्व साधनांचे घर जें कां ॥१॥ सहा चार अठरा वर्णिताती कीतीं \ नामें मोक्षप्राप्ती अर्धक्षणीं ॥२॥ शुकादिकीं नाम साधिलेंसे दृढ । प्रपंच काबाड निरसिलें ॥३॥ एका जनार्दनीं जनीं ब्रह्मनाम । तेणें नेम धर्म सर्व होय ॥४॥