भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारुनी भोजनें कीर्तनीं बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे

saruni bhojanen kirtanin baisale | thoriv varnile vithobache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सारुनी भोजनें कीर्तनीं बैसले । थोरीव वर्णिले विठोबाचे ॥१॥ प्रात:काळीं स्त्रियांसहित तो गोरा । निघालासे त्वरा पंढरीये ॥२॥ संतसमुदाय सवें पैं असती । पावलें त्वरित भीमातीरीं ॥३॥ एका जनार्दनीं करुनियां स्नान । घेतिलें दरुशन पुंडलिकाचें ॥४॥