भजनी मालिका
← भजनांकडे परत

सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें

saraten majhen tujhen | tari hen utaraten ojhen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सरतें माझें तुझें । तरि हें उतरतें ओझें ॥१॥ न लगे सांडावें मांडावें । आहे शुद्ध चि स्वभावें ॥ध्रु.॥ घातला तो आशा। मोहोजाळें गळां फासा ॥२॥ सुखदुःखाचा तो मान । नाहीं दुःखाचा तो शीण ॥३॥ करितां नारायण । एवढें वेचितां वचन ॥४॥ लाभ हानि हे समान । तैसा मान अपमान ॥५॥ तुका म्हणे याचें । नांव सोंवळें साचें ॥६॥