भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें

sarasar vichar kara uthauthi | nam dhara kanthin vithobachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सारासार विचार करा उठाउठी । नाम धरा कंठीं विठोबाचें ॥१॥ तयाच्या चिंतनें निरसलें संकट । तराल दुर्घट भवसिंधु ॥ध्रु.॥ जन्मोनियां कुळीं वाचे स्मरे राम । धरी हाचि नेम अहर्निशीं ॥२॥ तुका म्हणे कोटी कुळें तीं पुनीत । भावें गातां गीत विठोबाचे ॥३॥