भजनी मालिका
← भजनांकडे परत

सारा विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं

sara vitudandu | anik kanhi khel mandun

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सारा विटूदांडू । आणीक कांही खेळ मांडूं ॥१॥ बहु अंगा आले डाव । स्थिर नाहीं कोठें पाव ॥ध्रु.॥ कोली हाणे टोला । झेली तेणें तो गोविला ॥२॥ एकमेकां हाका मारी । सेल जाळी एक धरी ॥३॥ राजी आलें नांव । फेरा न चुकेचि धांव ॥४॥ पुढें एक पाटी । एक एकें दोघां आटी ॥५॥ एका सोस पोटीं । एक धांवे हात पिटी ॥६॥ तुका म्हणे आतां । खेळ मोडावा परता ॥७॥