भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतपूजन देव । तुष्टतसे वासुदेव

santapujan dev | tushtatase vasudev

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतपूजन देव । तुष्टतसे वासुदेव ॥१॥ संतपूजेचें महिमान । वेदां न कळें प्रमाण ॥२॥ संतचरणतीर्थ माथा । वंदिती तीर्थें पैं सर्वथा ॥३॥ एका जनार्दनीं करी पूजा । पूज्यापूजक नाहीं दुजा ॥४॥