भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी

santaninda jyache gharin | navhe ghar te yamapuri

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥ संतनिंदा आवडे ज्यासी । तो जिता चि नर्कवासी ॥२॥ तुका म्हणे तो नष्ट। जाणा गाढव तो स्पष्ट ॥३॥