भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं

santachinhen leuni angin | bhushan miraviti jagin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥ कामक्रोधलोभ चित्तीं । वरीवरी दाविती विरक्ती ॥२॥ आशापाशीं बांधोनि चित्त । म्हणती झालों आम्ही मुक्त ॥३॥ त्यांचे लागले संगती । झाली त्यांसी ते चि गति ॥४॥ तुका म्हणे शब्दज्ञानें । जग नाडियेलें तेणें ॥५॥