भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं

sansaracha mathan bhar | kanhin par na thevin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संसाराचा माथां भार । कांहीं पर न ठेवीं ॥१॥ भक्तीची ते जाती ऐसी । सर्वस्वासी मुकावें ॥ध्रु.॥ भिक्षाणी वेवसाव। काला करितो गाढव ॥२॥ करुनि वस्ती बाजारीं । म्हणवी कासया निस्पृही ॥३॥ प्रसादा आडुनि कवी । केलें तुप पाणी तेवीं ॥४॥ तुका म्हणे होंई सुर । किंवा निसुर मजुर ॥५॥