भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते

sansaracha het rahila magen | angasang vegen nohe kante

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसाराचा हेत राहिला मागें । अंगसंग वेगें नोहे कांते ॥१॥ एकांती राहाती परि न लिंपे कर्मा । वाउगाचि प्रेमा वरी दावी ॥२॥ माझ्या विठोबाची घातलीसे आण । नहोचि संतान वंशासी या ॥३॥ एका जनार्दनीं ऐसें चालत आलें । परि स्त्रियेनें केलें नवल देखा ॥४॥