भजनी मालिका
← भजनांकडे परत

संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधीं

sansara aliya ja re pandharipura | padurang soyara paha adhin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संसारा आलिया जा रे पंढरीपुरा । पाडुरंग सोयरा पहा आधीं ॥१॥ पुरती मनोरथ इच्छिले ते सांचे । अनंत जन्माचे दोष जाती ॥२॥ करितां स्नान भीमरथी तटीं । पुंडलीक दृष्टी लक्षुनियां ॥३॥ वेणुनाद गया पिडंदान फळ । गोपाळपूर सकळ देखिलिया ॥४॥ एका जनार्दनीं सारांचेआं तें सार । पंढरी माहेर सकळ जीवां ॥५॥