भजनी मालिका
← भजनांकडे परत

संकल्प विकल्प जाण । हेंचि मनाचें लक्षण

sankalpa vikalpa jan | henchi manachen lakshan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संकल्प विकल्प जाण । हेंचि मनाचें लक्षण ॥१॥ सुख दुःखें उभीं । मन वर्तें धर्माधर्मीं ॥२॥ स्वर्ग नरकक बंध मोक्ष । मन जाणतें प्रत्यक्ष ॥३॥ शुभ अशुभ कर्म । मनालागीं कळें वर्म ॥४॥ करा निःसंकल्प मन । म्हणे एका जनार्दनीं ॥५॥