भजनी मालिका
← भजनांकडे परत

संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा

sangen vadhe sin na ghade bhajan | trividh hen jan bahu deva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥ एकविध भाव राहावया ठाव । नेदी हा संदेह राहों चित्तीं ॥२॥ शब्दज्ञानी हित नेणती आपुलें । आणीक देखिलें नावडे त्या ॥३॥ तुका म्हणे आतां एकलें चि भलें । बैसोनि उगलें राहावें तें ॥४॥