भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगे मातेप्रती सापत्नें लोटिलें । म्हणोनी वाटलें दु:ख मज

sange mateprati sapatnen lotilen | mhanoni vatalen du:kha maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगे मातेप्रती सापत्नें लोटिलें । म्हणोनी वाटलें दु:ख मज ॥१॥ येरी म्हणे बाळा नको करु खेद । दैव नाहीं शुध्द आपुलें तें ॥२॥ आपुलिया दैवीं देवे जें लिहिलें । भोगणें प्राप्त जाहलें आपणांसी ॥३॥ एका जनार्दनीं देवाविण शीण । निवारील कोण दुजा बापा ॥४॥