भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगती ते ज्ञान तैसें । श्वान सूकरा सरिसें

sangati te dnyan taisen | shvan sukara sarisen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगती ते ज्ञान तैसें । श्वान सूकरा सरिसें ॥१॥ अंगीं नसोनि वर्म । दाविताती गुणकर्म ॥२॥ द्वैताची दावणी वाढ । भुलविती रांडानाड ॥३॥ अभागी ते पामर । नर्क भोगिती अघोर ॥४॥ सांगती पुराणकथा । उभे बाजारीं सर्वथा ॥५॥ एक जनार्दनीं नाहीं भाव । तेथें कैंचा उभा देव ॥६॥