भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांगती लोकां गुरु करा । आपुली आपण शुद्धी धरा

sangati lokan guru kara | apuli apan shuddhi dhara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांगती लोकां गुरु करा । आपुली आपण शुद्धी धरा ॥१॥ त्यांचे बोलणें वितंड । शिष्य मिळती तेहीं भांड ॥२॥ उपदेशाची न कळे रीत । द्रव्यसाठीं हात पसरीत ॥३॥ ऐशा गुरुच्या ठायीं भाव । एका जनार्दनीं वाव ॥४॥