भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडोनियां विठाबाई । कां रें पूजितां मेसाई

sandoniyan vithabai | kan ren pujitan mesai

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडोनियां विठाबाई । कां रें पूजितां मेसाई ॥१॥ विठाबाई माझी माता । चरणीं लागो इचे आतां ॥२॥ अरे जोगाई तुकाई । इजपुढें बापुड्या काई ॥३॥ एका जनार्दनीं माझीं आई । तिहीं लोकीं तिची साई ॥४॥