भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडी पां सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां

sandi pan sandi sansaracha chhand | athavi govind velovelan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडी पां सांडी संसाराचा छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥१॥ न लगे सायास न लगे सायास । आठवी श्रीहरीस मनोभावें ॥२॥ षड्‍वैरीयांचेंक तोडी पां बिरडें । करीं तूं कोरडे आशापाश ॥३॥ एका जनार्दनीं शरण स्वभावें । भोगी तूं गौरव वैकुंठीचें ॥४॥