भजनी मालिका
← भजनांकडे परत

सांडी मांडी नको करूं । वाउगा भरूं श्रमाचा

sandi mandi nako karun | vauga bharun shramacha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सांडी मांडी नको करूं । वाउगा भरूं श्रमाचा ॥१॥ जेथें तेथें धावें मन । करा खंडन तयाचें ॥२॥ नका घालुं गोंवागुंती । तेणें फजिती मागें पुढें ॥३॥ एका जनार्दनीं भाव । अवघा दिसे देवाधिदेव ॥४॥