भजनी मालिका
← भजनांकडे परत

संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां पेरि त्याचें

sanchit uttam bhumi kasuniyan | jaun nene vanyan peri tyachen

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां पेरि त्याचें ॥१॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥ गाईं दवडुनि घालिती बाहेरी । तंव म्हणे हरी बांधा त्या ही ॥३॥ त्याही तुम्ही बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वांड्यातुनि ॥४॥ पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥ नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥ मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका म्हणे ॥७॥