भजनी मालिका
← भजनांकडे परत

सानपणें धूरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य

sanapanen dhuru adhali baisala | sanapanen kela krutakrutya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सानपणें धूरु अढळी बैसला । सानपणें केला कृतकृत्य ॥१॥ सानपणें प्रल्हादें साधियेलें काज । सानपणें सहज बळी पूजी ॥२॥ सानपणें बिभीषण शरण आला । राज्यधर केला श्रीरामें त्यासी ॥३॥ एका जनार्दनें सानपणावांचुनी । ब्रह्माज्ञान जनीं नातुडेची ॥४॥