भजनी मालिका
← भजनांकडे परत

समुळ मुळीं पाहतां पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथें सहज परब्रह्मा

samul mulin pahatan pahanya uparam | bhog bhokta tethen sahaj parabrahma

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समुळ मुळीं पाहतां पाहण्या उपरम । भोग भोक्ता तेथें सहज परब्रह्मा ॥१॥ भोगुं मी काय त्यागुं मी काय । त्याग भोग दोन्हीं चैतन्य माय ॥२॥ भोग भोगितां भोग त्यागितां त्याग । दोन्हींचें निखळ अधिष्ठान अंग ॥३॥ एका जनार्दनीं एकपण त्यागी । ब्रह्मारुप जग आदळे अंगीं ॥४॥