भजनी मालिका
← भजनांकडे परत

समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं

samudra kshobhe velovelin | yogiya kshobhena konhakalin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समुद्र क्षोभे वेळोवेळीं । योगिया क्षोभेना कोण्हाकाळीं ॥१॥ समुद्रा भरितें पर्वसंबंधे । योगी परिपूर्ण परमानंदें ॥२॥ समुद्र सर्वदा तो क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ॥३॥ समुद्रीं वरुषतां घन । जीवनीं मिळतसे जीवन ॥४॥ योगियांची योग स्थिती । सदा परमार्थ भक्ती ॥५॥ एका जनार्दनीं शरण । योगियांचें जें योगचिन्ह ॥६॥