भजनी मालिका
← भजनांकडे परत

संपत्ती संतती मजला नावडे । स्वरुप आवडें तुझें देवा

sampatti santati majala navade | svarup avaden tujhen deva

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संपत्ती संतती मजला नावडे । स्वरुप आवडें तुझें देवा ॥१॥ तुझ्या रुपी सुख माझिया लोचनां । आणिक नारायणा न पाहती ॥२॥ हस्त इच्छिताती तुज भेटावया । सेवाहि कराया सर्व काळ ॥३॥ चित्त जडलें पायीं सदा सर्वकाळ । राहिली तळमळ तयाची ते ॥४॥ एका जनार्दनीं तुझें नाम मुखीं । नको अणिका सुखीं गोवुं मज ॥५॥