भजनी मालिका
← भजनांकडे परत

समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा

samarthachi dharili kas | atan nash kashacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥ धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥ न लगे मज पाहाणें दिशा । हाकेसरिसा ओढसी ॥२॥ तुका म्हणे नव्हे धीर । तुम्हां स्थिर दयेनें ॥३॥