भजनी मालिका
← भजनांकडे परत

समरंगणा आला । रामें रावण देखिला

samarangana ala | ramen ravan dekhila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥ कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥ प्रेमसुखाचें संधान । बाणें निवारिती बाण ॥२॥ तुकयास्वामी रघुनाथ । वर्म जाणोनि केली मात ॥३॥