भजनी मालिका
← भजनांकडे परत

समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा

samadhi nivrutti mhanatan | hare sansarachi vyatha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥ दृष्टीं पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाहीं तेथ ॥२॥ समाधि पाहतांचि डोळां । काय सांगूं तो सोहळा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । समाधि पहातांचि जाण ॥४॥