भजनी मालिका
← भजनांकडे परत

समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें

samacharanin man majhe vedhalen | ten vegalen hotan virah bolen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें । हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥ सांवळीया कान्हया नको जाऊं दुरी । राहे पेरपरता परतोनि हरी । पश्यंती मध्यमा मरुनी वैखरी । चारी वाचा तटस्थ जाहल्या हरी ॥२॥ तुझ्या वियोगाचा न व्हावा संग । अखंड नामीं असो अनुसंधान । शरण एका जनार्दने । काया वाचा मनें जाणोन ॥३॥