भजनी मालिका
← भजनांकडे परत

समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो

samacharanadrushti vitevari sajiri | tethen majhi hari vrutti raho

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥ ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥ तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३॥