भजनी मालिका
← भजनांकडे परत

साळंकृत कन्यादान । पृथ्वी दानाच्या समान

salankrut kanyadan | pruthvi danachya saman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
साळंकृत कन्यादान । पृथ्वी दानाच्या समान ॥१॥ परि तें न कळे या मूढा । येईल कळों भोग पुढां ॥ध्रु.॥ आचरतां कर्म । भरे पोट राहे धर्म ॥२॥ सत्या देव साहे । ऐसें करूनियां पाहें ॥३॥ अन्न मान धन । हें तों प्रारब्धा आधीन ॥४॥ तुका म्हणे सोसे । दुःख आतां पुढें नासे ॥५॥